लष्करात नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांना लाखोंचा गंडा, बोगस लष्कर अधिकारी जेरबंद

बोगस लष्कर अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना लाखो रुपयांचा गंडा घातला.
Fake Army officer Arrested
Fake Army officer Arrestedsaam Tv
Published On

सचिन जाधव

पुणे : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. बोगस लष्कर अधिकाऱ्याने लष्करात (Fake army officer arrested) नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांना आणि पालकांना (Money Fraud) लाखो रुपयांचा गंडा घातला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संजय रघुनाथ सावंत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट ४ ने ही धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Fake Army officer Arrested
अल्पवयीनचे अपहरण आणि अत्याचार प्रकरण : एक कोटींची लाच मागणारा निलंबित पोलीस गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय सावंत पठाणकोट येथील लष्करी सेवेत नोकरी देण्याचे आमिष नागरिकांना दाखवत होता. सदर आरोपी पुण्यातील देहू रोड येथे असणाऱ्या डिओडी डेपो येथे कामगार होता. दोन वर्षांपूर्वीच तो सेवेतून निवृत्त झाला होता. त्यानंतर आरोपी संजय पिंपळे-गुरव येथे रिक्षा चालवत होता. त्याने नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com