बलात्कार पीडितेच्या शिक्षणाची सोय करा - नीलम गोऱ्हेंच्या सुचना

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच आरोपींच्या विरोधात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या सुचना केल्या.
बलात्कार पीडितेचं पुनर्वसन करुन शिक्षणाची सोय करा - नीलम गोऱ्हेंच्या सुचना
बलात्कार पीडितेचं पुनर्वसन करुन शिक्षणाची सोय करा - नीलम गोऱ्हेंच्या सुचनाप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली: डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच आरोपींच्या विरोधात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या सुचना केल्या. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाची आणि वडिलांच्या रोजगाराची व्यवस्था करा अशा पोलिसांना सूचना केल्या. (Facilitate the education of rape victims - Neelam Gorhe's suggestions)

हे देखील पहा -

डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची, पिडीत तरुणी आणि तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे यांनी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात चार्जशीट दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत सूचना पोलिसांना दिल्या. पोलिसांनी फार थोड्या काळात आरोपींना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे.

पिडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता  येईल, त्यासाठी तिच्या पालकांशी बोलने झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे. तिचे वडील या प्रकरणामुळे रोजगारावर जाऊ शकत नाही. त्यांना बाकीची कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलिस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत कुटुंबाला येत्या पंधरा दिवसांत मदत दिली जाईल अशी माहिती गोऱ्हे  यांनी दिली आहे.

वर्षभरात गायब झालेल्या मुलींची माहिती घेत त्यांच्या अडचणी समजून घ्या –नीलम गोऱ्हे यांच्या पोलिसांना सूचना

डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केलीहोती. मात्र काही तासात  मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही असे पालकांनी सांगितले होते .या पार्श्वभूमीवर वर्षभरात हरविलेल्या, अपहरण झालेल्या किंवा गायब झालेल्या मुली जर परत आल्या असतील तर या मुली सुरक्षित आहेत ना? त्याची माहिती  सामाजिक संघटनाच्या माध्यमातून घेत या मुली अडचणीत असतील तर महिला दक्षता समितीने इतर काही गटांना जोडून घेत या मुलीना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना  विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसाना दिल्या आहेत.

बलात्कार पीडितेचं पुनर्वसन करुन शिक्षणाची सोय करा - नीलम गोऱ्हेंच्या सुचना
मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला बाळा नांदगावकर यांचा नाव न घेता टोला...

तरुणांमध्ये कायद्याच्या जनजागृतीची आवश्यकता आहे. सगळंच काम पोलीस करू शकत नाही नागरिकांनी देखील अशा घटना घडू नये यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com