Officers Transfer News : इकबाल सिंह चहल यांच्यासह ६ राज्यांच्या बड्या अधिकाऱ्यांची बदली; निवडणूक आयोगाच्या आदेशामागील कारण काय?

Election Commission Order to Officer transfer : निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिले आहे.
Election Commission
Election Commission Saam TV
Published On

Loksabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख पदांवर असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याते आदेशे निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. याशिवाय सहा राज्यातील गृह सचिवांची बदली करण्याचे निर्देश देखील निवडणूक आयोगाने दिले आहेत.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या गृह सचिवांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाचे सचिव, पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची देखील बदली करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Election Commission
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : 'दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांनी घरे फोडण्याचे लायसन्स घ्यावे'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोगाच्या आदेशाचं नेमकं कारण काय?

लोकसभा निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ अधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षा दलांच्या तैनातीवर परिणाम करू शकतात, अशी भीती निवडणूक आयोगाला होती.

निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार, जे अधिकारी आपल्या गृह जिल्ह्यात नियुक्त आहेत किंवा जे अधिकारी एकाच ठिकाणी ३ वर्षांहून अधिक काळापासून तैनात आहेत त्यांची निवडणुकीच्या आधी बदली केली जाते. असं करण्यामागचा उद्देश असतो की, अधिकारी एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या फायद्यासाठी निवडणूक प्रक्रिया प्रभावित करु नये.

Election Commission
Amravati Politics : CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो : बच्चू कडू

नवीन धोरणानुसार, आता अधिकाऱ्यांची बदली जिल्ह्याच्या बाहेर किंवा त्याच लोकसभा क्षेत्रात केली जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन केल्याचा फक्त देखावा नको, म्हणून दुसरा जिल्हा किंवा दुसऱ्या लोकसभा क्षेत्रात अधिकाऱ्यांची बदली केली जाते. निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात, असा उद्देश निवडणूक आयोगाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com