आम्हाला खात्री आहे हा निर्णय आमच्या बाजूने लागणार: आमदार भरत गोगावले

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Bharat Gogavale
Bharat GogavaleSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) देण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांना एक प्रकारे दिलासाच मिळाला असल्याचे बोलले जात आहे. आता यावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आम्हाला जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे घडत चालले आहे. आमचे चुकीचे काही नाही. दोन तृतीयांश मेजॉरीटी घेऊन आम्ही पुढे चाललो आहे, त्यामुळे हा निर्णय आमच्या बाजुनेच लागेल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.

'अनिश्चितता प्रमाणे ते कधी बसवतील त्यासाठी आमची तयारी आहे. आम्हाला खात्री आहे हा निर्णय आमच्या बाजूने लागणार आहे. आम्ही चुकीचे काही केलेले नाही, करणार नाही. आम्हला न्याय देवतेवर विश्वास आहे. शिंदे यांच्याकडे या बाबी सोपवली आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असला तर ते येतील.

Bharat Gogavale
मोठी बातमी! आमदारांवर तूर्तास कारवाई नको, सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

आज शिवसेना (ShivSena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीवर बोलताना आमदार गोगावले म्हणाले, शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, त्याला काही हरकत नाही. आज सकाळी आमदार भरत गोगावले यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे, पण कोणालाही कोणतीही जखम झालेली नाही. सगळे सुखरूप आहेत, असंही गोगावले म्हणाले.

Bharat Gogavale
Election 2022 : राष्ट्रवादीचं ठरलं! येत्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार

शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) देण्यात आले आहेत. त्यामुळे ही राज्याच्या राजकारणासाठी मोठी घडामोड मानली जात आहे.सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

आज शिवसेनेचे हे प्रकरण खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सुनावणीला वेळ लागणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com