एकनाथ शिंदेंना भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्टीकरण

आम्ही एकनाथ शिंदे यांना कोणताही प्रस्ताव दिला नाही तसेच त्यांच्याकडून देखील आम्हाला अद्याप तरी कोणताही प्रस्ताव आला नाही असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Chandrakant Patil News, Maharashtra Political Crisis News
Chandrakant Patil News, Maharashtra Political Crisis NewsSaam Tv
Published On

पुणे - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. यावर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil News in Marathi)

हे देखील पाहा -

चंद्रकांत पाटील म्हणले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसेच एकनाथ शिंदे यांचे सर्वच पक्षात जवळचे मित्र आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज देखील असू शकतात असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Chandrakant Patil News, Maharashtra Political Crisis News
Eknath Shinde LIVE updates: उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला ... शिवसैनिक गहिवरले

पुढे ते म्हणले, आम्ही एकनाथ शिंदे यांना कोणताही प्रस्ताव दिला नाही तसेच त्यांच्याकडून देखील आम्हाला अद्याप तरी कोणताही प्रस्ताव आला नाही असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच पंढरपूर येथील पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महा पूजा कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल ? या प्रश्नाचं चंद्रकांत पाटील यांनी सरळ सरळ उत्तर देणे टाळल, त्यावेळी जो राज्याचा मुख्यमंत्री असेल तोच महापूजा पंढरपूर येथील आषाढी एकादशीची महापूजा करेल असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com