शिवसेना, हिंदुत्व, बंडखोरांना भावनिक आवाहन; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ३३ आमदारांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे ठाकरे (Uddhav Thackeray) भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. अडीच वर्षातील त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. कोरोना काळात केलेल्या कामांचीही माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याच्या आरोप होत आहेत. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडावरही त्यांनी भाष्य केले.

Uddhav Thackeray
...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

कोरोना काळात केलेल्या कामाची आठवण

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलताना कोरोना काळात केलेल्या कामाची आठवण सांगितली. ठाकरे म्हणाले, कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळात जी लढाई आपण लढलो, त्यावेळी प्रसंग बाका होता. मला प्रशासनाचा कसला अनुभव नव्हता. कठीण काळात कोणीही तोंड देऊ शकलं नव्हतं. ज्यांच्या अनुभवाला हा अनुभव आला नव्हता. मला जे काही करायचं ते प्रामाणिकपणे केले.

हिंदुत्व सोडले आहे का?

शिवसेना, बाळासाहेबांची आहे, शिवसेनेनं हिंदुत्व सोडले असल्याच्या टीका सुरु आहेत. मी अस काय केल हिंदुत्व सोडले अशा टीका सुरू आहेत. शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट गुंफलेले आहेत. हिंदुत्वापासून शिवसेना कदापि दूर होणार नाही. म्हणूनच ८-१५ दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे, आमदार, खासदार मंत्री अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं. हे सांगण्याची वेळ नाही, असंही उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले.

मी कोणाला भेटत नाही असाही आरोप केला जातोय. माझ्यावर जी शस्त्रक्रिया झाली होती, त्याचा अनुभव काय होता त्याचं वर्णन काय होतं हे मी सांगत बसणार नाही. तो काळ विचित्र होता. त्यावेळीही आम्ही सर्वांची कामे केली आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Eknath Shinde LIVE updates: ..तर मुख्यमंत्रिपद अन् शिवसेना पक्षप्रमुखपदही सोडण्यास तयार: उद्धव ठाकरे

शिवसेनेचे काही आमदार गायब?

शिवसेनेचे काही आमदार गायब झाले आहेत, काहींना जबरदस्ती गुवाहटीला घेऊन गेले आहेत. यातील काहींचे फोन येतात, आम्हाला परत यायचे आहे असं ते सांगतात. विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी सगळे हॉटेलमध्ये होते. मी बघितले, ही कोणती लोकशाही? तेव्हा मला प्रश्न मला पडला. आपली माणसं एकत्र ठेवायला लागतात. मला हे पटत नाही. बाळासाहेबांनाही हे पटले नसते, असंही ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले.

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शरद पवारांनी दिली

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काही आठवणी सांगितल्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना शरद पवार यांनी मला बाजूला घेऊन मुख्यमंत्री पद तुमच्याकडे ठेवावे लागेल, अस सांगितले. 'सगळं ठीक आहे. ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. दोन्हीकडे ज्येष्ठ लोक आहेत. तुम्ही नसाल तर चालणे कठीण आहे. शरद पवार, सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको

मला आजपर्यंत सगळ्यांनी साभाळून घेतलं आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र्य आहेत. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. शरद पवार यांनी फोन केला होता, बाहेरच्या लोकांनी माझ्यावर भरवसा ठेवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर राऊतांनी दिली तीन शब्दात प्रतिक्रिया

...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार

यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, बंडखोर आमदारांनी समोर येऊन मला राजीनामा मागावा, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, फक्त गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी घाबरत नाही.

'पुन्हा आगतिकपणा नाही. लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही. सत्ता नसताना अनेक आव्हाने आम्ही पेलली आहेत. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी घाबरत नाही. आव्हानाला पाठ दाखवणारे आम्ही नाही. शिवसैनिकांनाही आवाहन करतो, मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास लायक नाही हे सांगणारे शिवसैनिकांनी सांगावे. मी हे पद सोडायला तयार आहे. मी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला मान्य आहे. समोर येऊन एकदा सांगा, सांगा असंही उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com