Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra news updates
Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra news updatesSaam Tv

शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची काँग्रेसची भूमिका राहील: पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली असल्याचे दिसत आहे. या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये असलेले १७ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. येत्या २४ तासात त्या आमदारांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर त्यांची मागणी मांडली तर विचार केला जाईल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. या विधानावरुन आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Prithviraj Chavan News in Marathi)

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी साम टीव्हीला प्रतिक्रीया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आहे की, नाही या बद्दल प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत राहीलेले नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे. शिवसेना बाहेर पडायला तयार असेल तर पर्यायी सरकार भाजपसोबत स्थापन करणार का? हा प्रश्न आहे. मी जेवढं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओळखतो ते भाजपच्या दबावाखाली जाऊन सरकार बनवणार नाहीत. त्यांना जायचे होते तर ते याअगोदरच गेले असते.

Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra news updates
Eknath Shinde Live Updates: एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय थोड्याच वेळात, व्हिडिओद्वारे देणार प्रतिक्रिया

'गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना काँग्रेसची (Congress) अडचण वाटत असेलतर आम्ही त्यांना बाहेरुन पाठिंबा देण्याचा विचार करु, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सरकार वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेला सर्वातपरी मदत करायला तयार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मी काँग्रेस समोर मांडेन. आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट वरुन बंडखोर आमदार जोपर्यंत भाजपमध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत पुढे काही होणार नाही. यात काही तथ्य आहे का भाजपकडून काहीच आलेले नाही. पुढची कारवाईही करत नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra news updates
...तर गुवाहाटीतील आमदारांचा विचार होईल; संजय राऊतांचे सूचक विधान

एकनाथ शिंदेंच्या हातात आता सर्व गोष्टी आहेत. ते पुढची भूमिका नेमकी काय करतात हे आता पाहून घेऊ. सर्व गोष्टी जर आणि तरच्या आहेत. महाविकास आघाडी सोडली तर सरकार बरखास्त होणार, तर शिवसेना भाजपसोबत जाणार का मला नाही वाटत ते जातील. मी जेवढे उद्धव ठाकरेंना ओळखतो ते तसे करणार नाहीत, असा विश्वासही चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com