
सचिन कदम
रायगड: शिवसेनेचे ज्येष्ठ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे शिवसनेने बंडखोर ४० आमदारांविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेच्या याचिकेवर गेल्या दोन महिन्यापासून सुनावणी सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने हे प्रकरण घटना पीठाकडे दिली आहे. आत या पुढील सुनावणी घटनापीठ घेणार आहे. यावर आता शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार भरतशेठ गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी मोठं विधान केले आहे.
शिवसेनेने केलेल्या याचिकांची सुनावणी आता घटनापीठ घेणार आहे. त्यामुळे हा निकाल येण्यासाठी अजून ४ ते ५ वर्ष लागू शकतात. तोपर्यंत पुढची निवडणूक येईल, असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिंदे गटाने मेळाव्याचे आयोदन केले होते. या मेळाव्यात बोलताना आमदार भरत गोगावले यांनी हे विधान केले आहे. यावेळी भरत गोगावले यांनी शिवसेनेवर टीका केली.
काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पुढे ढकलली गेली होती. पण, आज शिवसेनेनं याबद्दल सरन्यायाधीशांकडे विनंती केली. त्यामुळे अखेरीस सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली आहे. हे प्रकरण आता ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.