शिवसेनेच्या कारवाईविरोधात एकनाथ शिंदे गट सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी

राज्यात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. बंडखोर आमदारांचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत.
supreme court
supreme courtSaam Tv

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेने १५ आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १५ आमदारांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत उपसभापती, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, शिवसेनेचे उपनेते अजय चौधरी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींचा समावेश आहे. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.

supreme court
मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कार्टात याचिका केली दाखल

शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले, प्रकाश राजाराम सुर्वे, तानाजी जयवंत सावंत, महेश संभाजीराजे शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय सिरसाट, यामिनी यशवंत जाधव, अनिल बाबर, लतबाई चंद्रकांत सोनवणे, रामदास सोनवणे, रोवळे पाटील, संजय बोरकर, संजय पाटील, बालाजी देविदासराव कल्याणकर आणि बालाजी प्रल्हाद किनीलकर यांनी याचिका दाखल केली आहे.

supreme court
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धवा विसर तुझे सरकार...; भाजपच्या बड्या नेत्याचं ट्विट

एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी खळबळ माजवणारं ट्विट केलं आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल;आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..असं शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com