मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या पंढरपूर दौऱ्यावर निवडणूक आचारसंहितेचे सावट

आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार की नाही या चर्चा सुरू झाल्या आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde saam Tv
Published On

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विठ्ठलाची शासकीय पूजा कोण करणार या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पूर्णविराम मिळत शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार हे ठरले आहे. शासकीय पूजेचे निमंत्रणही शिंदे यांना देण्यात आले आहे, पण काल निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पंढरपूर दौरा अडचणीत आला आहे.

निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतरच निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतरच एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची परवानगी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर मधील शासकीय पूजेचे कार्यक्रम पार पडतील अस सांगण्यात येत आहे.

CM Eknath Shinde
पुणे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्टला होणार मतदान

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर निवडणूक आचारसंहितेच सावट असणार आहे. नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शासकीय दौरा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडणार आहेत.

CM Eknath Shinde
Pune : मोडकळीस आलेल्या ४५० वाड्यांना पुणे महापालिकेकडून नोटिसा; नागरिक म्हणाले...

९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर

राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची (Election) प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत.

बारामती, चाकण, दौंड,राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, मंचर, माळेगाव बुद्रुक या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, नगरपालिकांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आयोगाने दिलेल्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीयच्या कार्यक्रमानुसार आरक्षणासहित अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नगरपंचायतच्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देण्यात आला होता. त्यानुसार अंतिम प्रभाग निहाय मतदारांच्या याद्या अधिप्रमाणित करुन त्या प्रसिद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्राची ९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (State Election Commission)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप त्यात बदल करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आता हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com