मोठी बातमी! ...तर शिंदे गटातील ४ आमदार शिवसेनेत जाणार?

सुमारे महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्ता स्थापन करुन एक महिना झाला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन आता नवी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील २२ ते २३ आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे, तर मंत्रिपद मिळाले नाही तर तीन ते चार आमदार शिवसेनेत परत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येऊन सरकार कोसळू शकते असं बोलले जात आहे.

Eknath Shinde Latest News
फडणवीस यांना वगळून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शाह आणि शिंदे यांच्यात चर्चा?

नवे सरकार सत्तेत येऊन एक महिना होऊन गेला तरिही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिंदे गटातील प्रत्येकाल मंत्री व्हायचे आहे, या आमदारांनी मंत्रिपद मिळाले नाहीतर तीन ते चार आमदार पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. आणि तसे झाले तर शिंदे गटाकडे असलेली दोन त्रितांश ही संख्या राहणार नाही. त्यामुळे शिंदे गटाची कायदेशीर मान्यता रद्द होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिपदावरुन शिंदे गटात प्रचंड अस्वस्तता असल्याचे बोलले जात आहे. तीन ते चार आमदार बाहेर पडलेतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. शिंदे गटात ४० आमदार आहेत, आणि त्यांच्याकडे २२ ते २३ मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Eknath Shinde Latest News
१० वर्षानंतर शिवसैनिकाने घातली पायात चप्पल; बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर केला होता 'हा' पण

मंत्रिमंडळ विस्ताराची शाह आणि शिंदे यांच्यात चर्चा?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता टीका सुरू केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ५ वेळी दिल्ली दौरा केलेला आहे, यावरुन टीका सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर आता एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माध्यमांना गुंगारा देत दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारा संबंधित चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com