>> सूरज सावंत
मुंबई : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ईडीने सोमवारी इक्बाल सिहं चहलला चौकशीसाठी बोलावले असल्याचे कळत आहे.
ईडीने इक्बाल सिंह चहल यांच्या नावाने समन्स पाठवलं आहे, अशी माहिती आहे. इक्बाल सिंह चहल हे मुंबई महापालिकेचे आयुक्त आहे. त्यामुळे ईडी किंवा आयकर विभागाला जी काही माहिती किंवा कागदपत्रे लागतील ती इक्बाल सिंह यांच्या संमतीनेच मिळतील. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हे समन्स पाठवल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी आज EOW चे जॉइंट कमिशनर निशिथ मिश्रा यांची भेट घेतील होती. १४० दिवसांपूर्वी सुजीत पाटकर यांच्यावर सोमय्या यांनी कविड सेंटर घोटाळा प्रकरण संदर्भात तक्रार दाखल केली होती. १०० कोटी रुपयांच्या कोविड सेंटर घोटाळ्यासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सहकार्य करत नसल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केली होता. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे पार्टनर असून जम्बो कोविड सेंटर घोटाळा हा साधारण शंभर कोटींचा आहे. मला विश्वास आहे की यावर नक्की कारवाई होईल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.