Mumbai News : ईडीने झवेरी बाजारात मोठी कारवाई केली आहे. ईडीने पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीशी संबंधित मनी लॉंड्रिग प्रकरणात कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुंबईतील डिफेन्स बुलियन आणि क्लासिक मार्बल्सच्या एकूण चार परिसरात हा छापा टाकण्यात आला. ईडीने (ED) सदर कंपनीच्या गुप्त लॉकरची झडती घेतली. या लॉकरमधून ९१.५ किलो सोने आणि १५२ चांदी जप्त केली आहे. या व्यतिरिक्त ईडीकडून डिफेन्स बुलियन्स परिसरातून १८८ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे'.
ईडीने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ४७ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने आणि चांदी जप्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'कंपनीच्या खासगी लॉकरची झडती घेतली, त्यामध्ये योग्य नियमांचे पालन न करता लॉकर चालविल्याचे आढळून आले आहे. तसेच सदर लॉकर चालविताना 'केवायसी'चे पालन करण्यात आले नव्हते. तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही लावण्यात आले नव्हते. तसेच परिसरात जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नोंदणी होत नव्हती
दरम्यान, २०१८ साली पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात २२९६ कोटींचा कर्ज घोटाळा आणि मनी लांड्रिंग प्रकरण समोर आलं होतं. ईडीने छापा टाकलेल्या परिसरात एकूण ७६१ लॉकर होते. यात डिफेन्स बुलियनचे तीन लॉकर होते. सदर लॉकर उघडल्यावर त्यात ९१.५ किलो सोने, १५२ किलो चांदी आढळून आली. ईडीने सदर सोने-चांदी जप्त केली आहे. तसेच डिफेन्स बुलियनजवळ परिसरातून १८८ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. या सोने-चांदीची किंमत ४७ कोटींपेक्षा अधिक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.