
मुंबई : ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुंबई (Mumbai) आणि लगतच्या परिसरात ईडीनं (ED) छापासत्र सुरु केलं आहे. (ED Raids in Mumbai in Dawood Connection)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.