संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ? पत्राचाळ प्रकरणी मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी सुरु

पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असलेले संजय राऊत यांच्यावरील या कारवाईनंतर ईडी पुन्हा चौकशीची मागणी करू शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sanjay raut
Sanjay raut saam tv
Published On

सूरज सावंत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्राचाळ प्रकरणात अडचणी वाढताना दिसत आहेत. ईडीने संजय राऊत यांच्याशी संबंधित छापेमारी पुन्हा सुरू केली आहे. ईडीने पत्राचाळ प्रकरणी ईडीचे मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असलेले संजय राऊत यांच्यावरील या कारवाईनंतर ईडी पुन्हा चौकशीची मागणी करू शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sanjay raut
Vinayak Mete : विनायक मेटेंचा ड्रायव्हर कुणाच्या संपर्कात?; नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी

शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी पत्राचाळ प्रकरणात अटक केली. त्याआधी ईडीने ३१ जुलै रोजी भल्या पहाटे त्यांच्या मुंबईतील घरी छापा टाकला होता. त्यानंतर घरी आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर उशिरा रात्री त्यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची कोठडी आठ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात ईडीने पुन्हा छापेमारी सुरु केल्याने संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट झाले. त्यांनी म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

Sanjay raut
'शिवसैनिक असता तर बाळासाहेबांचा मुलगा...'; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल

सदर प्रकारणामध्ये आपण संजय राऊत यांची कोठडी मिळाल्यानंतर ईडीने केलेल्या तपासात वर्षा राऊत यांचे नाव देखील समोर आले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले. या कथित घोटाळ्यात वर्षा राऊत यांची चौकशी ईडीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com