Devendra Fadnavis : विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी केली; उपमुख्यमंत्री फडणवीस असे का म्हणाले ?

विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
devendra Fadnavis
devendra Fadnavis saam tv

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : 'राज्यातून उद्योग जात आहेत असे फेक नरेटिव्ह तयार केले जात आहे. यामध्ये काही एचएमव्हीचे ५ पत्रकार, काही राजकीय पक्ष आहेत. सर्वांनी राज्याच्या बदनामीचा घाट घातला आहे. या विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

devendra Fadnavis
महाराष्ट्रासाठी गोड बातमी! पुण्यात ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी; ५ हजार तरुणांना मिळणार रोजगार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'मागील अडीच वर्षात इतके भयानक कांड झाले, त्यामुळे कुणीही राज्यात यायला तयार नव्हते. राज्यात विस्कटलेली घडी आहे. ती आपण बसवण्याचा प्रयत्न केला आहे. २५ हजार कोटींचे प्रपोजल आमच्या सरकारने केले आहे. ही राज्यातील मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे '.

'गेल्या अडीच वर्षात राज्यात आलेली गुंतवणूक, विरोधकांनी परत पाठवली. राज्याचे नुकसान ज्यांनी केले, ते आज बोलत आहेत. यासाठी मात्र एचएमव्ही पत्रकाराने ट्विट केले नाही. फॉक्सकॉन राज्यात येणार नाही हे सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या काळात म्हणाले. त्यांना माहित होतं की आता फॉस्ककॉन येणार नाही. अनेक ठिकाणी देसाई असेच म्हणाले आहे', असेही फडणवीस पुढे म्हणाले.

devendra Fadnavis
"पुढाऱ्यांची पोरं पुढारीच होणार हा निसर्गाचा नियम", भाजपच्या बबनराव लोणीकरांचं वक्तव्य

'२३ सप्टेंबर २०२१ रोजी टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होतोय अशी बातमी आली होती. तेव्हा कुणाचे सरकार होते ? आम्ही विरोधीपक्षात गेलो की राज्य विसरत नाही. २०१६ साली तेव्हा हा प्रकल्प येत होता, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होते. तेव्हा मी म्हणालो गुजरातपेक्षा जास्त जागा देऊ. त्यानंतर सराकर बदललं मी विरोधी पक्षात असताना देखील टाटाच्या प्रमुखांना माझ्या सागर या निवास्थानी बोलावलं. त्यावेळी ते म्हणाले इथले वातावरण उद्योगासाठी योग्य नाही', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com