Devendra Fadnavis : 'राहुल गांधींना सावरकरांचा स देखील माहीत नाही'; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
Devendra Fadnavis and rahul gandhi
Devendra Fadnavis and rahul gandhi saam tv
Published On

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या भाष्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. 'काँग्रेसच्या वतीने सावरकरांबद्दल रोज खोटं बोललं जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वांचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकारांसारखा एक नेता दाखवा. अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis and rahul gandhi
Rahul Gandhi Viral Video: राहुल गांधींचा 'हा' व्हिडिओ व्हायरल; चिमुकली आणि राहुल गांधींचं संभाषण

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात 'हिंदुत्व' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राहुल गांधींवर निशाणा साधला. 'राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही. कुणीतरी त्यांना लिहून देतं. या लोकांना योग्य उत्तर दिलं पाहिजे, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

'हिंदू समाज हा देशाचा आत्मा आहे. तो मजबूत झाला पाहिजे. सावरकर म्हणतात अनेकांना माझी मारलेली उडी लक्षात आहे. पण ती उडी लक्षात ठेवू नका. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जात मानली नाही. अनेक लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले. जे सावरकरांना अपेक्षित होते, ते बाळासाहेब यांना होते. हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाही, ती एक व्यापक संकल्पना आहे. जे चांगले आहे, ती घेऊन जाणारी ही संस्कृती आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

'बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाला बंदी घातली. मला वाईट एका गोष्टीचे वाटते की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता. हिंगोलीमध्ये राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतात आणि आदित्य ठाकरे गळ्यात गळे घालतात. आमचे सोडा बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात काय वाटलं असेल? असा सवाल फडणवीसांनी शिवसेनेला केला.

'तुम्ही आम्हाला शिव्या द्या, पण सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करतात. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब यांचे नाते सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. जोपर्यत सावरकरांना अपमानित करणारे आहेत. त्यांना जमिनीत गाडल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com