उल्हासनगरचे डम्पिंग मलंगगड येथे; ग्रामस्थांचा विरोध

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
उल्हासनगरचे डम्पिंग मलंगगड येथे; ग्रामस्थांचा विरोध
उल्हासनगरचे डम्पिंग मलंगगड येथे; ग्रामस्थांचा विरोधSaam Tv
Published On

उल्हासनगर - महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड Dumping Ground मलंगगड परिसरातील उसाटणे गावाजवळ येणार आहे. या डम्पिंगच्या जागेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला, तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड Ganpat Gaikwad यांनी देखील या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सत्तेचा माज आला असेल, तर मी माज काढेन अशा शब्दात गायकवाड यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

उल्हासनगर Ulhasnagar शहराला स्वतःचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड नसून सध्या गायकवाड पाडा भागातल्या खदाणीत अवैधरीत्या कचरा टाकला जात आहे. या जागेची क्षमता आता संपली असून त्यामुळे शासनाने मलंगगड परिसरातील उसाटणे गाव जवळची जागा उल्हासनगर महापालिकेला डम्पिंगसाठी दिली.

हे देखील पहा -

मात्र या डम्पिंगला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. यानंतर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिका आणि गावकरी यांची एकत्र बैठक घेत तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.

मात्र तरीही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी या डम्पिंगच्या जागेची मोजणी करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. याचवेळी तिथे आलेल्या आमदार गणपत गायकवाड यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. आपलं आयुक्तांशी बैठकीबाबत बोलणं झालेलं असतानाही अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येणं चुकीचं असल्याचं गायकवाड म्हणाले.

उल्हासनगरचे डम्पिंग मलंगगड येथे; ग्रामस्थांचा विरोध
कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांसाठी 360.64 कोटी रुपयांचा निधी

ज्याठिकाणी डम्पिंगला जागा दिली आहे तिथून ५० मीटरवर शाळा असून तिथे आजूबाजूच्या गावातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे डम्पिंग अन्यत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी आहे. मात्र उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी दडपशाही करत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com