डोंबिवली: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉक्टरांना परत मिळाला मोबाईल

मोबाईल परत मिळाल्याने डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. आमिर कुरेशी व डॉ. श्वेता सिंग यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.
डोंबिवली: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉक्टरांना परत मिळाला मोबाईल
डोंबिवली: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉक्टरांना परत मिळाला मोबाईलप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली: कर्तव्यावर असताना सामाजिक बांधिलकी पोलिस जपत असतात. डोंबिवलीतील (Dombivali) वाहतूक पोलिसांनी (Dombivali Traffic Police) सतर्कता दाखवल्याने रिक्षात विसरलेला मोबाईल (Mobile) डॉक्टरांना परत मिळाला. वाहतूक पोलिसांच्या या कामाचे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कौतुक केले. (Due to the vigilance of the traffic police, the doctor got back the mobile)

हे देखील पहा -

डोंबिवलीतील बाज आर. आर. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग ह्या बुधवारी २४ तारखेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील नेहरू मैदानाजवळ रिक्षात बसल्या. रिक्षाने रुग्णालयात जात असताना मोबाईल रिक्षामध्ये त्या विसरल्या. रिक्षेतुन उतरल्यावर रुग्णालयात गेल्यावर डॉ. सिंग यांना आपण रिक्षातच मोबाईल विसल्याचे लक्षात आले. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता.

डॉ. सिंग यांनी वेळ न दवडता तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखेत संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी, गुरू छाया सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पंरतु कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. डॉ. सिंग यांनी केलेली रिक्षा व रिक्षा चालकाच्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि अखेर वाहतूक पोलिस जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले.

डोंबिवली: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉक्टरांना परत मिळाला मोबाईल
शरद पवार, अजित पवार, अनिल परब, पडळकर, खोत सगळे कालच्या परिक्षेत फेल- अ‍ॅड. सदावर्ते

जाधव यांनी सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्याकडील डॉ. सिंग यांचा मोबाईल घेऊन रुग्णालयाच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिला. जाधव यांच्या कामगिरीची माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी वरिष्ठांना माहिती दिली. तर डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. आमिर कुरेशी व डॉ. श्वेता सिंग यांनी आभार मानले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com