मुंबई: मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) वसईत (Vasai) मोठी कारवाई केली आहे. वसईच्या पेल्हार गावातून (Pelhar Village) १७२४ ग्रॅम हेराॅईन नावाचं ड्रग्स (अमली पदार्थ) जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या हेराॅईनची (Heroin Drug) आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी इतकी किंमत आहे. या कारवाईत पोलीसांनी २ लाख ६० हजार रोख रक्कमही जप्त (Confiscated) केली आहे. (Drug trafficking from shoe sole; Drugs worth Rs 5 crore seized by ATS in Vasai)
हे देखील पहा -
या प्रकरणी एटीएसने (Anti-Terrorism Squad) अलीम मोहम्मद अख्तर (वय ४६), छोटा मोहम्मद नासीर (वय ४०) या दोन ड्रग तस्करांना अटक केली आहे. हे दोघंही उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातले आहेत. वसईत (Vasai) एक फ्लॅट भाड्याने घेऊन ते हे अंमली पदार्थाची तस्करी करत होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनाही हे ड्रग्ज राजस्थानहून (Rajasthan) बुटाच्या सोलमध्ये लपवून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.