Dr. Ajay Taware : 'ससून'मध्ये त्वरित उपचारासाठी डॉ. अजय तावरे करायचा मध्यस्थी; पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठा संपर्क

Sassoon Hospital : डॉ. अजय तावरे ससून रुग्णालयात चांगले आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी तब्बल पाच जिल्ह्यांमध्ये मध्यस्थी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dr. Ajay Taware
Dr. Ajay TawareSaam Digital

अक्षय बडवे

पुणे कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याबाबत यांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील डॉ. अजय तावरे याचे दिवसेंदिवस नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अजय तावरे ससून रुग्णालयात चांगले आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी तब्बल पाच जिल्ह्यांमध्ये मध्यस्थी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील ससून पश्चिम महाराष्ट्रातील मोठ रुग्णालय असून राज्यभरातून याठिकाणी उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे शस्त्रक्रीया किंवा इतर महत्त्वाच्या उपचारांसाठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क केला की वेटिंगसाठी थांबावे लागत नसे. अजय तावरे चांगल्या आणि त्वरित उपचारासाठी मध्यस्ती करत असे. पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यामध्ये त्याचा मोठा संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे.

Dr. Ajay Taware
Mumbai- Pune Expressway: लोणावळ्यात तुफान पाऊस, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com