"मुंबईमधील नुकसानग्रस्तांना मदत करायला विसरू नका; अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल”

मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करायला विसरू नका; अन्यथा मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
"मुंबईमधील नुकसानग्रस्तांना मदत करायला विसरू नका; अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल”
"मुंबईमधील नुकसानग्रस्तांना मदत करायला विसरू नका; अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल”Saam Tv

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका; अन्यथा मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.(Don't forget to help the victims in Mumbai)

हे देखील पहा -

संपुर्ण राज्यात पावसामुळे अत्यंत जीवीत आणि वित्तहाणी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागातील लोकांना सर्वोत्तोपरी मदत देण्याचे आश्वासन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Cm Uddhav Thackeray यांना चिपळून दौऱ्यावर (Chiplun Tour) असताना केली होती. त्यांनी महाड चिपळून तसेच पश्चिम महाराष्ट्रातील Western Maharashtra भागाला हवी ती मदत आणि ती सुध्दा विनानिकष हे सरकार करणार आहे असं विधान केलं होतं. आता त्याच वक्तव्यचा आधीर घेत भाजपा नेते तसेच भाजपा मुंबई BJPMumbai प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याला मदत करत असताना मुंबईला विसरु नका अन्यथा मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल अशी विनंती वजा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

"मुंबईमधील नुकसानग्रस्तांना मदत करायला विसरू नका; अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल”
दौरा करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा; विनायक मेटेंचा नेत्यांना सल्ला

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे Heavy Rain झोपडपट्टीधारक, चाळीत राहणारे लोकं, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे जवळपास कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. तसेच चेंबूर, मुलुंड या ठिकाणीही दरडी कोसळून 40 पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत, कित्येक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्यांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. ठाकूर कॉम्प्लेक्स सह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी तसेच इतर अनेक वाहनांचे नुकसानLoss झाले आहे.

दरम्यान 2005 साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिक नुकसान आत्ताच्या पावसाने झाले आहे एवढं होऊनसुद्धा आत्तापर्यंत साधे नजर पंचनामे सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेले नाहीत. सरकारी अधिकारी फक्त खावटी अनुदान देऊ असे संतापजनक उत्तर देत आहेत.

या कोसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना आता तरी मदत करावी, अन्यथा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com