Dombivli Crime News : ५० हजारांचे कर्ज फेडण्यासाठी पावणे तेरा लाखांचे दागिने चाेरले, अवघ्या तीन तासांत डोंबिवली पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Dombivli News
Dombivli NewsSaam Tv
Published On

- अभिजित देशमुख

Dombivli News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराने पावणे तेरा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला हाेता. या चाेरीचा अवघ्या तीन तासांत डोंबिवली पोलिसांनी छडा लावला. पाेलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून ५० हजारांचे कर्ज फेडण्यासाठी दागिने चाेरल्याची कबूली संशयिताने दिली आहे. (Maharashtra News)

Dombivli News
Mumbai-Mandwa Ferry : मुंबई- मांडवा फेरीबोट सेवेस आजपासून प्रारंभ, तिकीट दर जैसे थे

एका सोनाराने कामगाराजवळ हॉलमार्क करण्यासाठी बारा लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. मात्र इतके दागिने पाहून या कामगाराची नियत फिरली आणि दागिने घेऊन तो पळून गेला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्याता साेनाराने तक्रार दाखल केली.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या नोकराने डोंबिवलीहुन ट्रेनने दादर गाठले, दादरहुन बांद्रा, बांद्राहून पुन्हा दादर. त्यानंतर कल्याणच्या दिशेने ताे येत होता. याच दरम्यान पोलिसांनी अवघ्या तीन तासात या नोकराला बेड्या ठोकल्या.

Dombivli News
NIA Raids In Boisar : दहशतवाद्यांना मदत? एनआयएचा बाेईसरला छापा, तिघे चाैकशीच्या फे-यात

विक्रम रावल असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. विक्रमने एका ठिकाणाहून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी व झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने या सोनाराला गंडा घातल्याचं तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 12 लाख 72 हजार रुपयाचे दागिने देखील हस्तगत केलेत.

Dombivli News
Mla Baban Shinde News : शेतक-यांचे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान हाेणार, आमदार बबन शिंदेंना भीती

या प्रकरणाचा तपास डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी योगेश सानप, अजिंक्य धोंडे, हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने केला. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com