डोंबिवली मधील मानपाडा पोलिसांनी घेतला तर्रीदार मिसळीचा आस्वाद

डोंबिवलीत भाऊसाहेब चौधरी फाऊंडेशन यांच्यातर्फे मिसळ मोहोत्सव भरविण्यात आला
Dombivli
Dombivli प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत भाऊसाहेब चौधरी फाऊंडेशन यांच्यातर्फे मिसळ मोहोत्सव भरविण्यात आला आहे. या मिसळ (Misal) महोत्सवाला भेट देण्यासाठी आणि विविध मिसळ खाण्यासाठी डोंबिवलीकरांनी (Dombivli) गर्दी करत आहेत. त्यातच आज 1 मे हा महाराष्ट्र दिन असल्याने मानपाडा (Manpada) पोलीस (police) स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना खास मिसळ पार्टीचे आजोयन करण्यात आले होते.

यावेळी सिनिअर पीआय शेखर बागडे,पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सुरेश मदने, अनिल पडवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी तर्रीदार मिसळीचा आस्वाद घेतला आहे. धकाधकीच्या जीवनात पोलीस कर्मचाऱ्यांना आनंद मिळण्याकरिता मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनिअर पीआय शेखर बागडे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

हे देखील पाहा-

डोंबिवलीत भरला मिसळ महोत्सव...

डोंबिवलीतील घारडा सर्कल परिसरात असलेल्या सावळाराम महाराज क्रिडासंकुलात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भाऊ चौधरी फाउंडेशन, आराध्या ग्रुप, शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे ३ दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवात कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, ठाणे, अहमदनगर, कल्याण, डोंबिवली अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून मिसळ विक्रेते सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते संजय राऊत हे या मिसळ महोत्सवाला भेट दिली आहे.

Dombivli
हिंसाचारानंतर प्रशासन कडक; ईदसह अनेक सणांना कर्फ्यू हटवला जाणार नाही

महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार - संजय राऊत  यांचा विरोधकाना इशारा....

मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकाना दिला आहे. शिवसेना व युवा सेनेतर्फे डोंबीवली सावळा राम क्रीडा संकुळावर मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी मिसळीचा आस्वाद देखील घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत विरोधकांना इशारा दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com