जॅक डॅनियल कॉटरची मागणी केल्याने ग्राहकास पोकळ बांबूचे फटके!

ग्राहकाने वेटरकडे जॅक डॅनियलची कॉटर मागितली म्हणून चक्क हॉटेल मॅनेजर आणि तीन वेटर यांनी ग्राहकाला पोकळ बांबूचे फटके दिले आहेत.
जॅक डॅनियल कॉटरची मागणी केल्याने ग्राहकास पोकळ बांबूचे फटके!
जॅक डॅनियल कॉटरची मागणी केल्याने ग्राहकास पोकळ बांबूचे फटके! SaamTvNews

डोंबिवली : डोंबिवली पाईपलाईन बदलापूर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणत ढाबे आणि हॉटेल्स आहेत. याच ढाब्यावरती  सायंकाळनंतर तळीरामांची गर्दी होत असते. या तळीरामांना अनेक वेळेला झिंग चढल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत होत असते. मात्र, वेळेला वेगळाच प्रकार घडला आहे. ग्राहकाने वेटरकडे जॅक डॅनियलची (Jack Daniel) कॉटर मागितली म्हणून चक्क हॉटेल मॅनेजर (Manager) आणि तीन वेटर यांनी ग्राहकाला पोकळ बांबूचे फटके दिले आहेत. त्यामुळे  रात्रीच्या वेळेस दारू पीत असाल तर सावधान...!  

हे देखील पहा :

डोंबिवली (Dombivli) पाईपलाईन बदलापूर (Badlapur) महामार्गाच्या कडेला मोठ्या ढाबे हॉटेल्स तयार झाले आहेत. सायंकाळ नंतर हॉटेल्स आणि ढाब्यांच्या बाहेर तळीरामांची तोबा गर्दी होत असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास कल्याण मधील तरुण मद्यपान करण्यासाठी खोणी गावाजवळील तरंग हॉटेल (Hotel) मध्ये गेला होता. दारू पिल्यानंतर फिर्यादी तरुणाने वेटरकडे जॅक डेनियलची कॉटरची मागणी केली असता ती देण्यास वेटरने नकार दिला. दरम्यान फिर्यादीने यांनी देखील ढोसलेल्या दारूसह ताव मारलेल्या खाण्याचे बिल देण्यास नकार दिला.

जॅक डॅनियल कॉटरची मागणी केल्याने ग्राहकास पोकळ बांबूचे फटके!
Hupari Video : चिकन विक्रेत्याकडून पत्नीची क्रूर हत्या; सत्तुराने केले शरीराचे तुकडे!

याचा राग आल्या नंतर तरंग हॉटेल मधील मॅनेजर आणि तिघांनी दारू ढोसलेल्या तळीरामाला बेदम मारहाण करत पोकळ बांबूचे फटके दिले. त्यामध्ये त्याला डोक्यावर, पाठीवर आणि उजव्या कानावर मार लागला आहे. त्यामुळे या फिर्यादीने हॉटेल मॅनेजर आणि वेटर यांच्या विरोधात मानपाडा पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान मानपाडा (Manpada) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com