डोंबिवली: ठाकुर्ली समांतर रोडवर मध्यरात्री बँक कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. पाच जणांच्या टोळीने धारधार शस्त्रांचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला (Bank Employee) लुटले होते. यानंतर रामनगर पोलीस (Ramnagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV Footage) सहाय्याने पाचही आरोपींना अटक (Arrested) केली आहे, हे सर्व आरोपी 18 ते 22 वयोगटातील आहे. (Dombivali: 5 robbers arrested robbing a bank employee; Ramnagar police crackdown)
हे देखील पहा -
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांच्या आसपास संतोषकुमार घरी जात होते. यावेळी मास्क परिधान केलेल्या चार ते पाच लुटारूंनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि काही क्षणांतच घेरले. त्यांच्या गळ्यावर चाकू लावत आणि धमकी देत त्यांना लुटले. त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल, क्रेडिट कार्ड, एटीएम घेऊन ते सर्व लुटारू तेथून पसार झाले. संतोषकुमार शर्मा यांनी या लुटीची माहिती तातडीने पोलिसांना महिती दिली.
डोंबिवली (Dombivali) रामननगर पोलीसांनी त्वरित गुन्हा दाखल करत एसीपी जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंगटे, विशाल वाघ, शंकर निवळे, राजेंद्र जाधव, विलास शिंदे विकास भामरे, प्रशांत सरनाईक, निलेश पाटील, दिलीप कोती, सोमनाथ पिचड, वैजिनाथ रावखंडे आणि जयपाल मोरे यांचे पथक तयार केले आणि तपास चालू केला.
पोलिसांनी तातडीने परिसरातील आणि शेलार नाका येथील सीसीटीव्ही तपासले आणि पुढील तपास सुरु केला. सीसीटीव्हीमध्ये पाच आरोपी स्पष्टपणे दिसत असल्यामुळे आणि गुप्तहेरच्या माहिती द्वारे या घटनेतील पाचही आरोपींच्या (Robbers) मुसक्या रामनगर पोलिसांनी आवळल्या आहेत. हे पाचही आरोपी शेलार नाका येथील त्रिमूर्तीनगर वसाहती मधील रहिवाशी असून आशु दुमडा(वय19), कुणाल बोध (वय२२), विशाल जेठा(वय19), सलमान पुहाल (वय19), गणेश लोट (वय18) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडुन गुन्ह्यातील लॅपटॉप, मोबाईल व असा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली हत्यारे सुरा, कोयता, विळा, नॉन चाकु, स्क्रु ड्रायव्हर, इलेक्ट्रीक पक्कड असे मेमोरेंडम पंचनामा दरम्यान जप्त करण्यात आले आहे. या पाचही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता 30 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.