मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची पाठराखण केली आहे. आमदार नितेश राणेचं (Nitest Rane) नाव न घेता राऊतांनी (Sanjay Raut) त्याच्यावर टिका केली आहे. "कालची पोरं पवारांना टार्गेट करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे मान्य आहे का?" असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. ("Does Modi agree that young politicians are targeting Pawar?" - Raut's question)
हे देखील पहा -
नवी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुडबुद्धीने काम करतायत. त्यांना टार्गेट दिलं जातयं, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टार्गेट केलं जातयं. विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांना टार्गेट केलं जातयं. शरद पवारांना (Sharad Pawar) बदनाम केलं जात आहे, दाऊदशी संबंध जोडला जात आहे. कालची आलेली पोरं हे शरद पवारांना टार्गेट करतायत. ज्या भाषेत ते पवारांबद्दल बोलतात हे फडणवीसांना (Devendra Fadnavis) मान्य आहे का? हे मोदींना (PM Modi) मान्य आहे का? हे नितीन गडकरींना मान्य आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, या महाराष्ट्रात लोकांचा सन्मान झाला पाहिजे. ज्या लोकांना महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं, ५०-५५ वर्ष ज्यांनी संसदेत घालवली त्याच्याविषयी कोणत्या प्रकारची भाषा भाजपवाले वापरतात ती फडणवीसांनी वापरुन बघावी असा टोलाही त्यांनी लागवला.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.