जयश्री मोरे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, शिवसेनेकडून यावर टीका केली जात आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, अरे कसला अल्टिमेटम? काय होतं अल्टिमेटमने? अल्टिमेटवर देश चालतो का? एखाद्या पक्षाने अल्टिमेटम दिला म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णय घेतले जात नाहीत. महागाई १०० दिवसात कमी होईल असाही अल्टिमेट काहींनी दिला होता. पण झाली का? एक प्रशासनाची व्यवस्था असते. इथे कायद्याचं राज्य आहे म्हणून कोणाच्या अल्टिमेटम वर निर्णय घेतले जात नाहीत. राज्यात शांतता, सुव्यवस्था चांगल्या प्रकारे सुरु आहे असे म्हणत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
'कोणी भ्रमात राहू नये';
राऊत म्हणाले, सभेतून इशारे दिले धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असे होणार नाही. कोणी भ्रमात राहू नये की आम्ही इशारे दिले त्यानुसार संपूर्ण ऍक्शन होईल, असही संजय राऊत म्हणले आहेत. ते म्हणाले, आज शुभ दिवस आहे. आज अक्षय तृतीय आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान सुद्धा आहे. लोकांना आपापले उत्सव साजरे करू द्या, असं आवाहन राऊतांनी यावेळी केलं.
सुपारी देऊन महाराष्ट्रात शांतता बिघडवण्यासाठी प्रयत्न;
ते म्हणाले, 'एखाद्या राजकीय पक्षाला राज्याची शांतात बिघडवण्याची सुपारी दिली जाते. तर सरकारने आधी त्या सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रात शांतता बिघडवण्यासाठी हे काही प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुखमंत्र्यांसोबत चर्चा केली. सर्व शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतक हे राज्य मजबूत पायांवरती उभ आहे. या राज्यातील प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना राज्य चालवण्यचा मोठा अनुभव आहे. कोणीही उठतो आणि धमक्या देतो असं नाही होणार, असे म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे देखील पाहा-
...यातच त्यांचा वेळ जाणार;
राऊतांनी सांगितलं की, धमक्या देणाऱ्यांची जी प्रेरणा आहे. त्यांचं माघे ज्या काही शक्ती आहेत त्यानं राज्यात सत्तेवर येता आलं नाही. त्यांना लोकांनी दूर केलं आहे. त्यांचं जे वैफल्य आहे ते दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढतात. याला शौर्य म्हणत नाहीत. त्यांनी समोर येऊन लढायला पाहिजे. त्यांनी हे करत राहावं. यातच त्यांचा वेळ जाणार आहे.सरकार सरकारचे काम करत आहे, असं संजय राऊतांनी यावेळी बोलत असताना सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.