कोरोना रुग्णांमध्ये बोन डेथ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेत

कोविड- १९ विषाणूने जगभरातील अनेकांचे प्राण घेतलं आहे. पण त्याचा प्रकोप अजूनही देखील कमी झालेला नाही. या विषाणूचे नवे व्हेरियंट तयार होत आहेत.
कोरोना रुग्णांमध्ये बोन डेथ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेत
कोरोना रुग्णांमध्ये बोन डेथ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेतSaam Tv
Published On

मुंबई : कोविड- १९ Covid विषाणूने जगभरातील अनेकांचे प्राण घेतलं आहे. पण त्याचा प्रकोप अजूनही देखील कमी झालेला नाही. या विषाणूचे नवे व्हेरियंट तयार होत आहेत. याबरोबर कोविडची बाधा होऊन, बरे झालेल्या रुग्णां मध्ये वेगवेगळी लक्षणे Symptoms दिसून येत आहेत. Doctors in Mumbai worried over Bone death

मुंबईतील Mumbai ४० वर्षांहून कमी वय असलेल्या, ३ रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस किंवा डेथ ऑफ बोन टिश्युज दिसून आल्याने, मुंबई मधील डॉक्टर चिंतेत आहे. २ महिन्यांपूर्वी कोविड मधून बऱ्या झालेल्या, रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस Black fungus या आजारांची लक्षणे दिसून आले होते. तशीच आता मुंबईमधील ३ रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणे दिसून आली आहेत.

हे देखील पहा-

येत्या काही महिन्यांमध्ये अशी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी चिंता मुंबईमधील डॉक्टरांना वाटत आहे. कोविड- १९ बाधितांवर परिणामकारक ठरणारी स्टिरॉइड्स म्युकरमायकॉसिस झालेल्या व आता अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस झालेल्या रुग्णांना देण्यात आली आहे. हा दोन्ही प्रकरणांमध्ये सामायिक घटक आहे. कोविडवरील उपचार घेतल्यावर २ महिन्यांनंतर अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणे दिसलेल्या ४० वर्षांखालील ३ रुग्णांवर माहिम मधील हिंदुजा हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी उपचार केल आहे. Doctors in Mumbai worried over Bone death

माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटल Hinduja Hospital मधील मेडिकल डायरेक्टर व ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डाँक्टरानी म्हणाले की, त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरील भागात दुखणे जाणवेल ते सगळे डॉक्टर होते, म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आले आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी हॉस्पिटल गाठले. डाँक्टरानी यांचा अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस अज ए पार्ट ऑफ लाँग कोविड-१९ हा रिसर्च Research पेपर प्रतिष्ठित मेडिकल जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते म्हणाले की कोविड- १९ वरील उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आल्याने एव्हीएनच्या केसेस पुढे येत आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये बोन डेथ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेत
White Fungus - पांढऱ्या बुरशीमुळे महिलेच्या आतड्याला पडले छिद्र , डॉक्टर झाले हैराण

इतर ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनीही वृत्त देताना सांगितले आहे की, त्यांच्याही पाहण्यात एव्हीएनच्या काही केसेस आले आहेत. सरकारी हॉस्पिटल मधील एका डॉक्टरांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे, की दीर्घकाळ कोविड- १९ चा त्रास होणाऱ्या रुग्णांना स्टिरॉइड्स द्यावी लागतात व तोच चिंतेचा विषय ठरत राहिला आहे. राज्य सरकारच्या कोविड- १९ टास्क फोर्सचे सदस्य व इंटेसिव्हिस्ट डॉ. राहुल पंडित म्हणाले, मी एव्हीएनचे पेशंट शोधत आहे. सामान्यपणे स्टिरॉइड्सचा वापर झाल्यानंतर, ५ ते ६ महिन्यांत पेशंटमध्ये एव्हीएनची लक्षणे दिसतात.

आपल्याकडच्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक एप्रिलमध्ये गाठलेला होता. यामुळे आता २ ते ३ महिन्यांमध्ये एव्हीएनचे पेशंट सापडू शकतात असे वाटतं आहे. या दुसऱ्या लाटेच्या काळात पेशंटला मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्स दिली गेली असल्याने, लवकरच या रुग्णांमध्ये एव्हीएनची लक्षणे आढळू शकतात. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस स्पेशलिस्ट असणाऱ्या डॉक्टरांनी यावर बायस्फोसफोनेट रिजिम नावाने एक मेडिकल ट्रिटमेंट विकसित केल आहे. जी काही 20 वर्षांपासून जगभरात एव्हीएनच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी वापरली जात आहे. Doctors in Mumbai worried over Bone death

त्यांच्या अभ्यासानुसार कोविड होऊन गेलेल्या, रुग्णांमध्ये २ ट्रेंड दिसून येत आहेत. जे खरोखर चिंताजनक वाटत आहे. १ म्हणजे कोविड झालेला असताना पेशंटना या स्टिरॉइडचा ७५८mg चा डोस दिले गेले आहे. हाच डोस २०००mg इतका दिला गेला तर, शरीरात एव्हीएनची समस्या निर्माण होऊ शकते. इतक्या कमी प्रमाणाच्या डोसमध्ये एव्हीएनची लक्षणे दिसणे ही एक चिंतेची बाब आहे. दुसरी चिंतेचे कारण म्हणजे साधारणपणे स्टिरॉइड्स घेतल्यानंतर ६ महिने ते १ वर्षात एव्हीनए विकसित होतो, पण तो कोविड पेशंटमध्ये लवकर विकसित होताना दिसत आहे.

डाँक्टरानी यावर म्हणाले की, सहसा विकसित व्हायला, इतका वेळ लागत असताना, पेशंट्समध्ये मात्र, निदानानंतर ५८ दिवसांमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत. कोविड-१९ झालेला असताना, स्टिरॉइड्स दिलेल्या रुग्णांना खुब्यात किंवा मांडीत दुखणे जाणवत असेल, तर त्यांनी MRI करून घ्यावे, आणि त्यांना हिपचा एव्हीएन झाला नाही. ते तपासून घ्यावे. जर लवकर बायस्फोस्फोनेट थेरेपी सुरू केली, तर त्यांचा हा आजार लवकर बरा होऊ शकणार आहे. सामान्यपणे एव्हीएन झाल्यावर, सर्जरी करावी लागते. पण ज्या पेशंटना त्याची लक्षणे दिसली, त्यांनी लगेचच उपचार घेतल्याने, त्यांना ही सर्जरी करण्याची गरज पडलेली नाही. Doctors in Mumbai worried over Bone death

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com