सरकार आपलं तरीही गुन्हे आपल्यावर का? कॅबिनेट बैठकीत वाद; Congress गृहमंत्र्यांवर नाराज

मुंबई पोलिसांनी तलवार हातात घेतली म्हणून काँग्रेसनेते अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत.
MVA Goverment
MVA GovermentSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : आज महाविकास आघाडी सरकारची (MVA Goverment) मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसंच सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आज कोरोना निर्बंध हटवले आहेत. मात्र याच आजच्या कॅबिनेट बैठकीत आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

एका कार्यक्रमात हातात तलवार घेतल्याबद्दल भाजपनेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड (Aslam Shaikh and Varsha Gaikwad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर तलवार हातात घेतली म्हणून काँग्रेसनेते अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत आणि हाच मुद्दा उपस्थितीत करत या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली असून सरकार आपलं आहे तरीही गुन्हे आपल्यावच, मंत्र्यांवर मुंबई पोलिस कारवाई कसे करतात यावरून कॅबिनेट मंत्री नाराज होते. दरम्यान गुन्हे दाखल कोणत्या कारणांमुळे केले यांची माहिती घेण्यासाठी मुख्य सचिव यांची समिती रिपोर्ट मागवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com