डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मधील १४ गावातील दहिसर येथे एका जमिनीच्या मोजणीचे काम सुरु असताना एका टोळक्याने जागा मालकासह मोजणी अधिकाऱ्यांना धमकाविल्याची (Threat) घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. याप्रकरणी ७ ते ८ जणांविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dispute over land in Dahisar village in 14 villages)
हे देखील पहा -
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावात आता पुन्हा एकदा जमिनींचे वाद (Land Dispute) उफाळून आले आहेत. दहिसर गावातील एका जागेवरती ७ जानेवारीला शेतकऱ्यांच्या जागेच्या मोजणीचे काम सुरु होते. यावेळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने फिर्यादी याला धमकावले आणि जमिनीची मोजणी करायची असल्यास दोन कोटी रुपये आत्ताच द्या असे सांगितले. यावेळी ह्या टोळक्याने फिर्यादी शेतकऱ्याच्या कुटुंबियांना गोळ्या मारून ठार मारू अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने जमीन मोजणीचे काम बंद पाडले.
याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात मोहम्मद रईस चौधरी, मेहमूद चौधरी, सचिन पाटील, नाझीर चौधरी आणि इतरांवर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान सचिन याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ब्लॅक मेल करणाऱ्या अश्या टोळक्यांना कठोर शासन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.