दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस डबल अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'सागर'वर बैठकांचा सपाटा

Devendra Fadnavis In Double Action Mode : राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकींबाबत सागर बंगल्यावर बैठकांचा सपाटा सुरु आहे.
Devendra Fadnavis News, BJP Latest Marathi News
Devendra Fadnavis News, BJP Latest Marathi NewsSaam Tv
Published On

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह (corona negative) आला आहे. फडणवीस हे दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाले आहेत. ५ जूनला त्यांना कोरोनाची लागण (corona positive) झाली असल्याचं त्यांनी ट्वीट करुन सांगितलं होतं. आता ते कोरोनातून पुन्हा बरे झाले आहेत. कोरोनातून दुसऱ्यांदा बरे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस डबल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. फडणवीसांचे शासकीय निवासस्थान 'सागर' बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकींबाबत (Election) या बैठकांचा सपाटा सुरु आहे. (devendra fadnavis in double action mode after 2nd time corona negative)

हे देखील पाहा -

देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असताना ते होम क्वारंटाईन होते, पण तरीही ते ऑनलाईन बैठकांच्या माध्यमातून सक्रिय होते. आता कोरोना निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीत गिरीश महाजन, आशिष शेलार, श्रीकांत भारतीय, विनायक मेटे इत्यादी नेते आले आहेत. भाजपा आमदार संजय कुटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पॅाझिटिव्ह असतानाही आम्हांला मार्गदर्शन करत होतेच. आज आम्हाला ते ३ वाजता मार्गदर्शन करणार आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार

भाजपने विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या पाच नावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. ही सहावी जागा लढवत भाजपने मोठी खेळी आहे. मात्र पंकजा मुंडे, चित्रा वाघ या नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

Devendra Fadnavis News, BJP Latest Marathi News
President Election: राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची होणार घोषणा; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार

राज्ससभा निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत. यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या १० जूनला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com