'बारामतीकरांनी डिपॉजिट जप्त केलं, तरी कळेना; अजित पवारांनी साधला गोपीचंद पडळकरांवर निशाणा

तळेगाव दाभाडे परिषदेच्या विकासकामाच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात अजित पवारांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
AJit Pawar And gopichand Padalkar
AJit Pawar And gopichand PadalkarSaam Tv

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तळेगाव दाभाडे परिषदेच्या विकासकामाच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात अजित पवारांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.' काहींना काय वाटत आपल्याला आमदार केलं म्हणजे आपण खूप मोठे झालो. बरं तरी बारामतीकरांनी डिपॉजिट जप्त केलं. तरी कळेना, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) निशाणा साधला. ( Ajit Pawar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

तळेगाव दाभाडे परिषदेच्या विकासकामाच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यात आमदार सुनील शेळके , आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अजित पवारांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जोरदार टीकास्त्र सोडलं. अजित पवार म्हणाले, 'काहींना काय वाटत आपल्याला आमदार केलं म्हणजे आपण खूप मोठे झालो. बरं तरी बारामतीकरांनी डिपॉजिट जप्त केलं. तरी कळेना. काय बोलावं, किती बोलावं याच भान ठेवा की? आरोप करताना तारतम्य बाळगा, कंबरचे खालचे आरोप करता, अरे महिला ही ऐकतात. याचं भान ठेवा,अशा शब्दात अजित पवारांनी पडळकरांनी जोरदार निशाणा साधला.

AJit Pawar And gopichand Padalkar
'२०१४ चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते'

या कार्यक्रमात अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर का ओरडतो याचे कारणही सांगितले. अधिकाऱ्यांवर का ओरडतो या भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'विकास काम हे जनतेच्या पैशातून होतात. ते काम योग्यच अन् देखणंच व्हायला हवं. म्हणून मी अनेकदा अधिकाऱ्यांना ओरडतो. पत्रकार ते कॅमेऱ्यात कैद करून दाखवतात. अधिकाऱ्यांवर का ओरडू नये सांगा, शासकीय अधिकाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला आहे. मग त्यांनी कामात कुचराई केलेली चालणार नाही. चांगलं काम केलं तर आम्ही कौतुक करायला ही मागे पुढे पाहत नाही.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com