महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; भाजप नेते राज्यपालांना भेटणार

Demand Of Presidential rule in Maharashtra: ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच कायदा हातात घेतला असं दरेकर म्हणाले.
Demand for imposition of Presidential rule in Maharashtra; BJP leader will to meet governor
Demand for imposition of Presidential rule in Maharashtra; BJP leader will to meet governorSaam TV
Published On

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आहे असं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातली कायद-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच कायदा हातात घेतला. काही दिवसांपूर्वी जेव्हा फडणवीसांच्या घरावर कॉंग्रेस कार्यकर्ते चाल करुन येत होते तेव्हा एक-दोन किमी आधीच त्यांना रोखण्यात आलं. मग, राणा दाम्पत्याच्या (Navneet Rana) घराबाहेर शिवसैनिकांना का जमा होऊन दिलं? मातोश्रीबाहेर का गर्दी जमा केली? तुम्ही ठरवलं असतं तर पोलिसांच्या मदतीने एका मिनीटात सगळं कंट्रोल केलं असतं. पण सरकारलाच ताकद दाखवायची होती, की आम्ही काहीही करु शकतो असं सरकारला दाखवायचं होतं असा आरोप दरेकरांनी केला आहे. (Demand for imposition of Presidential rule in Maharashtra; BJP leader will to meet governor)

हे देखील पाहा -

दरेकर पुढे म्हणाले की, भाजपला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी १०० टक्के परिस्थिती आहे. कायद्याचं नियंत्रण नाही. सरकारचेच लोक जेलमध्ये आहेत. अनेक लोकांवर केसेस चालू आहेत, रडारवर आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारमधलेच आमदार, नेते हे विनयभंग, बलात्कार करतायत. आता तर पोलिसांच्या उपस्थितीत हाणामाऱ्या करण्याचे प्रकार घडतायत. आमचा पोलखोल रथ तोडला, कांदीवलीतला स्टेज तोडला, मोहित कंबोजवर हल्ला केला, राणांच्या घरावर चालून जाणं हे कसले लक्षणं आहे असा सवाल त्यांनी केला. तसेच तुम्ही ठरवलं असतं तर मुंबई पोलिसांनी १० मिनिटात कंट्रोल केलं असतं, पण तुम्हालाच कंट्रोल करयाचं नाही. एकटा मोहित कंबोज ५०० लोकांना कसा जीवे मारू शकतो? उलट तुम्हालाच कंबोजला मारायचं होतं. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी ही स्क्रिप्ट लिहिलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

Demand for imposition of Presidential rule in Maharashtra; BJP leader will to meet governor
तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रपती राजवटीबाबत दरेकर म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लावण्यासाखी परिस्थिती आहे. राज्यात अराजकता आहे. असंच जर चालू राहिलं तर महाराष्ट्र नियंत्रणाबाहेर जाईल. अनेकांची डोके फुटतील. कोण कुणाच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. सरकार नावाची चीज नाही. कुठलं नियंत्रण नाही. राज्य अराजकसदृश्य उंबरठ्यावर आहे. अशी परिस्थिती राष्ट्रपती राजवटीसाठी पोषक आहे असं दरेकर म्हणाले आहेत. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी लवकरच भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार असल्याचंही ते म्हणालेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com