सुशांत सावंत
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मेधा सोमय्या (Medha Somaiya) या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी आहेत. "शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी मला बदनाम करण्यासाठी १०० कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप केले असं मेधा सोमय्या म्हणाल्या आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी" असा मानहानीचा खटला (Defamation Suit) मेधा सोमय्या यांनी आज (बुधवारी) शिवडी मुंबई कोर्टात दाखल केला आहे. (Defamation suit Filed Against Sanjay Raut By Kirit Somaiya's wife Medha Somaiya)
हे देखील पाहा -
यावेळी किरीट सोमय्या शिवसेनेला धारेवर धरलं आहे. राऊतांबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप केले. याविरोधात आज आम्ही मानहानीची याचिका दाखल केली आहे. मेधा सोमय्या यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून २६ मे ला पुढची सुनावणी होणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
१०० कोटींचा टॉयलेट घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?
किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (१६ एप्रिल) केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे असं राऊत म्हणाले होते. तसेत ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला. किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल असं राऊत म्हणाले होते.
तसेच पुढे सोमय्या म्हणाले की, मला विश्वास आहे संजय राऊत यांना समन्स जाणार. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. चौकशीचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते पण काय झाल? चार महिन्यात काहीच सिद्ध झाले नाही. इतका तमाशा केल्यानंतर एक रुपयाचाही घोटाळा बाहेर आला नाही. सजा भोग्याला होणार उत्तर उद्धव ठाकरेंना मिळणार, आम्ही यावेळी यांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.