Deepak Kesarkar : धनुष्यबाण हे शिंदे गटाचंच, आजच्या परिस्थितीला ठाकरे गट जबाबदार; दीपक केसरकरांचं टीकास्त्र

. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोपी दीपक केसरकर यांनी केला आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsaam tv
Published On

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह गोठवल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली. आम्हाला धनुष्यबाणाबद्दल अभिमान आहे, बाळासाहेबांबद्दल अभिमान आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे धनुष्यबाण हे शिंदे गटाचंच आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

Deepak Kesarkar
Shivsena: उद्धव ठाकरेंकडून 'त्रिशूळ'सह तीन चिन्ह सादर; पण त्यापैकी एकही मिळणार नाही; कारण...

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) गळा काढायचं काम सुरू आहे. खरंतर आमच्यावर अन्याय झाला आहे. या निर्णयाला तेच जबाबदार आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम ते सध्या करत आहेत, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. (Shivsena Lates News)

अंधेरी पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची सहानुभूती कशी मिळवायची त्यांची ही रणनिती आहे. निवडणूक आयोगसमोर त्यांनी कागदपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे आम्ही पुन्हा निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नाव मागणार आहेत. आम्ही खरे आहोत म्हणून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

सहानुभूतीच्या जोरावर बाळासाहेब कधीही लढले नाही. कामाने लोकांना जिंकावे लागते. ते काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80 टक्के समाजकारण केलं आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असा शिवसैनिक आज मुख्यमंत्री पदावर आहे. बाळासाहेबांचा कौतुकाचा हात अनेकदा एकनाथ शिंदेच्या पाठीवर होता. मात्र त्यांना आता त्रास दिला जात आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

Deepak Kesarkar
Sharad Pawar: शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल, त्यांच्याजवळ गेलेले संपले; विजय शिवतारेंची टीका

शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याचं दुःख आम्हाला आहे. चिन्हावर आमचा दावा कायम आहे. निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे आम्ही हरलो हे चुकीचं आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com