स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांच्या संख्येबाबतचा निर्णय एकमताने - एकनाथ शिंदे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांच्या संख्येबाबतचा निर्णय एकमताने - एकनाथ शिंदेEknathShindeTwitter/SaamTV

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांच्या संख्येबाबतचा निर्णय एकमताने - एकनाथ शिंदे

नगरपंचायती साठी 1 , नगर पालिकेत 2 आणि महापालिकेत 3 सदस्यीय प्रभाग असतील.
Published on

मुंबई - राज्यात महापालिका (Municipal Corporation) आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग पद्धत (ward method) असणार असा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये (cabinet meeting) घेण्यात आला. यामध्ये नगरपंचायतीच्या 1 सदस्य, नगर पालिकेत 2 सदस्य आणि महापालिके साठी 3 सदस्यीय प्रभाग असतील मात्र या मधून मुंबई महापालिकेला वगळण्यात आलं आहे. (Decision on the number of members unanimously - Eknath Shinde)

हे देखील पहा -

चार प्रभाग सदस्यांचा प्रस्ताव होता मात्र हा प्रभाग मोठा होत असल्याने ही सदस्य संख्या कमी केली तसेच नागरी सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे नगरपंचायत छोटी असते म्हणून त्या ठिकाणी 1 सदस्य पद्धत असणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ज्या त्या भागातील नागरिकांना सुविधा देणं सोयीचं होईल या अनुशंगाने हा आजच्या मंत्रीमडळाच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचही शिंदे म्हणाले . तसेच 4 सदस्यीय प्रभाग हा मोठा प्रभाग होतो आणि नागरी कामांच्या सोईसाठी आम्ही प्रभाग संख्या कमी केली असून याचा फायदा आगामी निवडणुकीत फायदा होईल असे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांच्या संख्येबाबतचा निर्णय एकमताने - एकनाथ शिंदे
मुंबई वगळता अन्यत्र तीन सदस्यीय प्रभाग पालिका निवडणूक (पहा व्हिडीओ)

राजकीय फायद्यासाठी हा निर्णय नाही.

राजकीय फायदा होईल अस मनात न ठेवता लोकांना नागरी सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या मार्फत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व नागरिकांची कामे व्हावी, राज्य शासणाकडून येणाऱ्या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्यात ते म्हणाले. दरम्यान एका पत्रकाराने या निर्णयाचा फायदा महाविकास आघाडीला (MVA) होईल का विचारलं असता नक्कीच फायदा होईल, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com