दहीहंडी साजरी करणारच - भाजपच्या राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

दहीहंडी साजरी करणारच यासाठी राज्य सरकारचा फतवा आम्हाला उत्सव साजरे करण्यापासून अडवू शकत नाही असं म्हणत राम कदमांनी राज्य सरकारला एक प्रकारे आव्हानच दिलं आहे.
दहीहंडी साजरी करणारच - भाजपच्या राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
दहीहंडी साजरी करणारच - भाजपच्या राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना आव्हानSaamTv
Published On

मुंबई : राज्य सरकारणे आज आयोजित केलेली बैठकMeeting ही गोविंदा पथकांचीGovindaPathk आणि हिंदू Hinduबांधवांची फसवणूक करणारी होती या बैठकीला असणारे सर्व आजी माजी आमदार जे सत्ताधारी लोकांचे होते, ते आपल्या नेत्यांसमोर काय बोलणार आहेत असा सवाल विचारत भाजपा आमदार राम कदमBJP MLA यांनी आपल्या पत्रकार परिषदेतPress Conferance राज्य सरकारचे आदेश डावलून आपण दहीहंडी साजरी करणार असल्याच जाहीर केलं.Dahihandi will be celebrated - BJP's Ram Kadam challenges the Chief Minister

हे देखील पहा-

मुंबई आणि महाराष्ट्रात मोठे आयोजक आहेत यामध्ये मीसुध्दा घाटकोपरच्याGhatkopar मंडळाचा प्रमुख आयोजक आहे मात्र आम्हाला बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनीCM बोलावलं नाही. आजची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आजी माजी आमदार जे सत्ताधारी लोकांचे आहेत ते आपल्या नेत्यासमोर काय बोलणार आहेत? असा प्रश्न विचारत बैठकीमध्ये शासणाची भूमिका मान्य करणाऱ्या पथक प्रमुखांना कदमांनी टोला लगावला. तसेच आजची बैठक गोविंदा पथकांची आणि हिंदू बांधवांची फसवणूक करणारी होती असही कदम म्हणाले.

फसव्या घोषणा करणारं फसव सरकार

हिंदू भावनांचा सन्मान स्व. बाळासाहेब ठाकरेंनीBalasaheb Thackeray केला मुख्यमंत्र्यांकडून पण हिच अपेक्षा होती मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला.

हे देखील पहा-

राज्य सरकारने बार, मॉलMall उघडायला परवानगी दिली आहे त्यावेळी कोरोनाची Corona तिसरी लाटThird Wave येत नाही, मग देऊळ उघडताना हिंदूंचे सण साजरे करतानाच कोरोनाची तिसरी लाट कशी येते का दारूची दुकाने काय वेगळं चिलखत घालून बसले आहेत का असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच मागच्या 2 वर्षात या सरकारण जनतेची काय काळजी घेतली ते जनता विसरलेली नाही. गणपती दहीहंडी उत्सव साजरे करताना कशी काळजी घ्यायची हे लोकांना माहिती आहे तुम्ही मात्र फक्त फसव्या घोषणा करता आणि फसव्या घोषणा करणार हे फसव सरकार असल्याची घणाघाती टीकाही राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

आम्हाला सरकारचा फतवा अडवू शकत नाही

आयोजक या नात्याने घाटकोपरला श्रीकृष्ण जन्मोत्सवShrikrishna Janmotsav साजरा करणारच असा पवित्रा राम कदमांनी घेतला आहे शिवाय हिंदू सण हे आमचा आत्मा आहेत आणि आम्ही दहीहंडी साजरी करणारच यासाठी राज्य सरकारचा फतवा आम्हाला उत्सव साजरे करण्यापासून अडवू शकत नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला एक प्रकारे आव्हानच दिलं आहे. आता राज्य सरकार आणि राम कदम यांच्यातील संघर्ष अजून कोणत्या टोकाला जातोय हे श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच सर्वांना कळेल.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com