Dahi Handi Mumbai 2023: गोविंदा आला रे आला...; जय जवान पथकाकडून तब्बल ९ थरांची सलामी

Dahi Handi 9 Layers : कोण किती थर रचणार यावरून गोविंदांमध्ये शर्यत लागल्याचं पाहायला मिळतंय.
Dahi Handi Mumbai 2023
Dahi Handi Mumbai 2023Saam TV

Dahi Handi 2023 Thane:

आज देशात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी केली होती. अशात गोविंदांमध्ये देखील मोठा उत्साह संचारला आहे. कोण किती थर रचणार यावरून गोविंदांमध्ये शर्यती लागल्याचं पाहायला मिळतंय. अशात ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये तब्बल ९ थर रचण्याच आलेत. (Latest Marathi News)

वर्तक नगर परिसरात मोठी दहीहंडी बांधण्यात आली आहे. सर्व गोविंदा पथके ही दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. थरांचे मनोरे उभे राहून खाली कोसळत आहेत. अशात कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने येथे ९ थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केलाय. तर जय जवान पथकाने यशस्वी सलामी दिलीये. एकावर एक थर रचत या गोविंदांनी ही सलामी दिली आहे. त्यांचा उत्साह पाहण्यासाठी नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली आहे.

Dahi Handi Mumbai 2023
Dahi Handi News: महिला काँग्रेसने फोडली भ्रष्टाचार व महागाई विरोधात दहीहंडी

मुंबई ठाण्यात ठिकाणी राजकीय हंड्यांच आयोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आदित्य ठाकरे सगळेच मैदानात उतरले आहेत. भाजपकडून ४०० हंड्यांचे आयोजन करण्यात आलेय. देवेंद्र फडणवीस बोरीवलीतील प्रकाश सुर्वे, ठाण्यातील प्रताप सरनाईक आणि घाटकोपर येथील राम नाईकांच्या हंड्यांना लावणार हजेरी लावणार असल्याची माहिती मिळालीये.

दहीहंडीच्या उत्सवामुळे ठाण्यात सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्यातील अनेक भागातून दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी लोकं गर्दी करत असतात. यामुळे ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क झालेत.

Dahi Handi 2022 LIVE | ठाण्यातील राजकीय दहीहंडी लाईव्ह, शिंदेंच्या दहीहंडीला किती लाखांचं बक्षीस?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com