चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.
सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो.
फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.
मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत आहेत.
भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.