राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाईचे संकट; लोडशेडिंगचे ऊर्जा मंत्र्यांनी दिले संकेत

Crisis of electricity : कोळसा मिळाला तर रेल्वे ट्रॅक उपलब्ध होतं नाहीत. त्यामुळे आम्ही CGPL कंपनी कडून वीज विकत घेत आहोत, अशी माहिती वीज मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
Nitin Raut
Nitin RautSaam Tv
Published On

मुंबई: राज्यात लोडशेडिंग होऊ नये, 24 तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी आज मंत्री मंडळाची बैठक झाली. या बैठकीत वीज (Electricity) यंत्रणेबाबत चर्चा झाली. राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. राज्याला सध्या कोळसा साठा उपलब्ध होत नाही. कोळसा मिळाला तर रेल्वे ट्रॅक उपलब्ध होतं नाहीत. त्यामुळे आम्ही CGPL कंपनी कडून वीज विकत घेत आहोत, अशी माहिती वीज मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. (Crisis of electricity)

सध्या कोयना धरणात 17 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. वीजनिर्मीतीसाठी (Electricity) एका दिवसाला 1 TMC पाणी लागते 17 दिवसाचासाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वीज निर्मिती केंद्र अडचणीत आले आहे. राज्यात भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. गुजरातने (Gujrat) एक दिवस वीज बंद केली आहे.

Nitin Raut
Mumbai : मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक?, नव्या धोरणात दरवाढीचा प्रस्ताव | SAAM TV

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावरील विजेचे (Electricity) संकट गहिरे होत आहे. त्यामुळे आता पूर्वीच टाटा कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार मेगावॅट वीज खरेदी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक झाली.

राज्य सरकारने टाटा कंपनीच्या सीजीपीएल (CGPL) कडून 760 मेगा वॅट वीज खरेदी करणार आहे.या मुद्रा येथील प्रकल्पाबाबत एक करार केला होता. त्यानुसार, साडेतीन रुपये प्रतियुनिट वीज मिळणार होती. मात्र, आता देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे. अशा परिस्थिती कंपनीला कोळसा आयात करावा लागत आहे. त्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे सहा रुपये दराने वीज देण्यास कंपनीने अनुकूलता दर्शविली आहे. 4.50 पैसे दर अधिकृत करारानुसार मिळणार आहे. राज्यमंत्री मंडळाने वीज खरेदीला मान्यता दिली आहे.

मागच्यावर्षी 16 ते 20 रुपयांनी वीज खरेदी केली होती त्यासाठी 192 कोटी खर्च आला होता. आता नव्या दरामुळे राज्याच्या तिजोरीवर साधारण 150 कोटींचा भार पडणार असल्याचे राऊत म्हणाले. (Crisis of electricity)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com