फेरीवाल्यांकडून पैसे उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा!

मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एका आरोपीला अटक
फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा!
फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा!SaamTVNews
Published On

कल्याण : कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात आठवडा बाजार भरवला गेला आहे. विशेष म्हणजे कोविडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाले बसत आहेत. अनेक ठिकाणी फेरीवाले (Peddlers) मास्क सुद्धा लावताना दिसत नाहीत. डोंबिवली (Dombivli) नंतर कल्याण (Kalyan) मध्ये  फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हीडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

हे देखील पहा :

या व्हिडिओत (Video) एक इसम फेरीवाल्यांकडून पैसे (Money) वसुली करताना दिसत आहे. या प्रकरणी फेरीवाल्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तक्रारदार महिला दीपाली जाधव यांनी पोलिसांकडे (Police) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, काल ती भाजीपाला विक्री करत असताना दोन इसम तिच्याकडे आले आणि त्यांनी पैशाची मागणी केली.आज धंदा झालेला नाही. मी पैसे देऊ शकत नाही असे मी त्यांना सांगितले मात्र त्या दोघांनी जबरदस्तीने पैसै मागण्यास सुरुवात केली.

फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा!
बाब्बो, लातुरात पतीची संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा!

कल्याण-डोंबिवलीचे (KDMC) माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या ऑफीसमधून काही लोक पैसे मागण्यासाठी येतात असे दीपाली जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात दीपाली यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा समावेश आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.

फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा!
बांग्लादेशी अभिनेत्रीची पतीनेच मित्राच्या मदतीने केली हत्या; मृतदेह गोणीत भरून फेकला!

या प्रकरणी माजी नगरसेवक (Corporator) कुणाल पाटील यांनी सांगितले की, हे एक राजकीय षडयंत्र आहे. राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. यापुर्वीही माझ्यावर असे आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.  दरम्यान कोरोना काळात या आठवडी बाजारास (Weekly Market) परवानगी कोणी दिली असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com