मीरा रोड मध्ये संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न, पती-पत्नी वाचले, मुलगी दगावली

मीरा रोड मध्ये संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News mumbai
Crime News mumbaiSaam Tv
Published On

मुंबई : मीरा रोड (Mira rode) मध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. कर्जाच्या संकटाला कंटाळलेल्या एका दाम्पत्याने ७ वर्षांच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मीरा रोड येथील सीझन हॉटेलमध्ये घडली. या दुर्देवी घटनेत आत्महत्येचा प्रयत्न (suicide case) करणाऱ्या पती-पत्नीचे प्राण वाचले आहेत. मात्र त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. अनायका ब्राको असं मृत पावलेल्या (Girl death) मुलीचं नाव आहे. वसईच्या एव्हरशाईन येथे ब्रायन राको त्यांची पत्नी पूनम आणि मुलगी अनायका ब्राको यांच्यासह राहत होता. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News mumbai
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रायन राको हा पत्नी पूनम आणि ७ वर्षांची मुलगी अनायका ब्राको यांच्यासोबत वसईच्या एव्हरशाईन येथे वास्तव्यास होता. खासगी कंपनीत काम करणारा ब्राको कर्जबाजारी झाला होता. कर्जाच्या दडपण असल्याने राको कुटुंबीयांची मानसिक स्थिती ढासळली होती. गेल्या आठवड्यात वसईच्या एक्सप्रेस इन या हॉटेल मध्ये राको कुटुंबीय गेले होते. त्यावेळी हॉटेलचे १५ रुपयांचे बिल देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे ते सर्व बिल न देताच निघून गेले. त्यानंतर २७ मे रोजी मीरा रोड येथील सीझन हॉटेलमध्ये रहायला गेले.

तेव्हा रात्रीच्या वेळी ब्रायन आणि पत्नी पुनमने त्यांच्या मुलीसह उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पूनमला जाग आली. तेव्हा ब्रायन रुममध्ये नव्हता आणि मुलगी बेशुद्ध झाली होती. या घटनेनंतर पूनमने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून काशिमिरा पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पूनम आणि मुलगी अनायकाला भाईंदरमधील टेंभा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनायकाला मृत घोषीत केले. ब्रायन आणि पूनमने रात्री हॉटेलच्या खोलीत विष घेतले होते. ब्रायनला जेव्हा जाग आली तेव्हा तो पत्नी आणि मुलीला त्याच अवस्थेत टाकून फरार झाला. ब्रायनचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com