CoronaVirus: रुग्णसंख्या वाढतेय! पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलवाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक...

ऑक्सिजन पुरवठा, औषधसाठा याचा आढावा घेण्याबरोबरच जम्बो कोविड सेंटर्स (Jumbo Covid Center) पुन्हा सज्ज करण्याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे.
CoronaVirus: रुग्णसंख्या वाढतेय! पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलवाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक...
CoronaVirus: रुग्णसंख्या वाढतेय! पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलवाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक...Saam Tv
Published On

मुंबई: मुंबईतल्या वाढत्या कोरोना रुग्णांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लसीकरण आणि टेस्टींग वाढवण्याबरोबरच निर्बंधाबाबत चर्चा होणार आह. ऑक्सिजन पुरवठा, औषधसाठा याचा आढावा घेण्याबरोबरच जम्बो कोविड सेंटर्स (Jumbo Covid Center) पुन्हा सज्ज करण्याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. (CoronaVirus: The number of patients is increasing! Guardian Minister Aditya Thackeray called a meeting of municipal officials)

हे देखील पहा -

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रूग्णसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यानं अधिकाधिक रूग्णांना रूग्णालयात दाखल करायची वेळ आल्यास, त्यादृष्टीने काय नियोजन करता येईल हेदेखील पाहिले जाणार आहे. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) बोलावलेल्या या बैठकीत (Meeting) पालिका आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. त्याचप्रमाणे ओमिक्रॉनबाबतही चर्चा होणार आहे.

CoronaVirus: रुग्णसंख्या वाढतेय! पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलवाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक...
मुंबईकरांनो 31st आणि न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत? थांबा आधी पालिकेची नियमावली वाचा...

मुंबई महापालिकेने (BMC) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याआधीच कोरोना नियमावली जाहिर केली आहे. ज्यात ३१ डिसेंबर आणि न्यू इयर पार्ट्यांवर बंधनं घालण्याल आली आहेत. देशात ओमिक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण हे दिल्लीत आहेत, त्यामुळे दिल्ली सरकारनने मिनी लॉकडाऊन जाहिर केले आहे. दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहे, ज्यात मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com