Covid-19 : ठाणेकरांवर कोरोनाचे वाढते सावट; जिल्ह्यात आतापर्यंत ९९२ रुग्णाची नोंद

Covid-19 Patients Is Growing Up In Thane : येत्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Covid-19 Patients Is Growing Up In Thane
Covid-19 Patients Is Growing Up In ThaneSaam Tv
Published On

ठाणे: कोरोना हळू-हळू पुन्हा डोकं वर काढू लागल्याने ठाणेकरांच्या (Thanekars) चिंतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात (Thane) कोरोना रुग्णाची संख्या ही एक हजाराच्या घरात पोहचली असून ठाणे जिल्ह्यात चक्क चौथी लाट (4th Wave Of Covid-19) येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे (Corona) निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Coronas growing threat to Thanekars So far 992 patients have been registered in the Thane district)

हे देखील पाहा -

कोरोनामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेला समोर गेल्यानंतर अखेर कोरोनाचे सावट कमी झाले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोकं वर काढू लगण्याने चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ९९२ वर येऊन पोहचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात १९८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त हे ओमायक्रोन बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे. ठाण्यात २३ मे पासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. २३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात २१ कोरोनाबधित रुग्ण संख्या तर १७२ सक्रिय रुग्ण होते. मात्र हीच संख्या आता १९८ कोरोना बाधित आणि ९९२ सक्रिय रुग्णांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे चौथी लाट सदृश्य परिस्थिती तयार होऊ लागली आहे. जर रुग्ण संख्येत अशाच प्रकारे झपाट्याने वाढ होऊ लागली तर ठाणे जिल्ह्यात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेप्रमाणे पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह्यात ज्या प्रकारे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेकडून कोविडच्या लसीकरणावर पुन्हा जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कोविडच्या लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घ्यावा तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटाइजरचा वापर करावा असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. कैलाश पवार यांनी केले आहे. ठाणे महानगर पालिकेकडून ठाणेकरांसाठी ठाण्यातील सिव्हील शासकीय रुग्णालयात लसीकरणात वाढ करून बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

Covid-19 Patients Is Growing Up In Thane
मास्क वापराच! मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७ हजारांपार

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आढावा :

दिनांक - २३ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - २१

कोरोना सक्रिय रुग्ण – १७२

दिनांक - २४ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ४२

कोरोना सक्रिय रुग्ण - १८८

दिनांक - २५ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ४९

कोरोना सक्रिय रुग्ण - १९३

दिनांक - २६ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ५९

कोरोना सक्रिय रुग्ण - २१२

दिनांक - २७ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ७०

कोरोना सक्रिय रुग्ण - २१६

दिनांक - २८ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ८०

कोरोना सक्रिय रुग्ण - २५०

दिनांक - २९ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ६४

कोरोना सक्रिय रुग्ण - ३०९

दिनांक - ३० मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ५१

कोरोना सक्रिय रुग्ण - ३४८

दिनांक - ३१ मे २०२२

कोरोना बाधित रुग्ण - ९६

कोरोना सक्रिय रुग्ण - ३८५

दिनांक - १ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - १५५

कोरोना सक्रिय रुग्ण - ४०३

दिनांक - २ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - १६५

कोरोना सक्रिय रुग्ण - ४९६

दिनांक - ३ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - १७८

कोरोना सक्रिय रुग्ण – ५०९

दिनांक - ४ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - २५६

कोरोना सक्रिय रुग्ण - ७२४

दिनांक - ५ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - २७३

कोरोना सक्रिय रुग्ण - ८१०

दिनांक - ६ जून २०२२

कोरोना बाधित रुग्ण - १९८

कोरोना सक्रिय रुग्ण - ९९२

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com