Corona Virus In Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या तीन लाटांनंतर कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलं आहे. (Latest Marathi News)
कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं आहे. एकीकडे हवामानातील बदलामुळे लहान मुलांपासून मोठ्या लोकांचा तब्येती खराब झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे अनेकांना घसा दुखणे, सर्दी खोकला आणि ताप आला आहे.
अशातच पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यात कोरोनाचे 248 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, आज राज्यात 203 रुग्ण कोरोनापासून (Corona Virus) बरे झाले आहेत. त्यांना डिचार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानेआहे. सध्या राज्यात कोरोनाचे 3 हजार 532 हून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईची कोरोना परिस्थिती काय?
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत (Mumbai News) कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुंबई शहरात रविवारी 172 कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. आज यामध्ये आणखी 75 रुग्णांची भर पडली आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे मनपा हद्दीत 55 तर नवी मुंबईत 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेने खरबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारी सुरु केली आहे. महानगरपालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.