Cordelia cruises Corona Update: मुंबई : आज संध्याकाळी 6 वाजता कॉर्डेलिया क्रूझ (Cordelia Cruise) मुंबईत येणार आहे. त्यानंतर स्क्रिनिंगसाठी महापालिका (BMC) टीम पोहोचेल, अशी माहिती आहे. कॉर्डेलिया जहाजावरील 66 जण पॉझिटीव्ह (Corona Poisitive) आढळले आहेत. त्यामुळे कॉर्डेलिया क्रूझ कोरोनाचं सेंटर ठरली आहे. या जहाजावरील त्यांना ग्रीन गेटवर उतरण्यापूर्वी जहाजावरील उर्वरित प्रवाशांचे RT-PCR करण्याचा सल्ला दिला जाईल. त्यांचा अहवाल येईपर्यंत कोणालाही क्रूझवरुन उतरु देणार नाही (Cordelia Cruise Coming Back To Mumbai BMC Team Will Do The Screening)
कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्णांसाठी, रिचर्डसन आणि क्रुडास किंवा सशुल्क हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यासाठी ग्रीन गेटवर रुग्णवाहिका पाठवली जाईल. बीएमसीने प्रत्येकी 17 आसनी 5 रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली आहे. 66 पॉझिटीव्ह रुग्णांना आज रिचर्डसन आणि क्रुडास किंवा सशुल्क हॉटेलमध्ये वेगळे केले जाईल. इतर प्रवासी सध्या क्रूझवर राहतील.
आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Test) 2 लॅबद्वारे केली जाईल. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत RTPCR अहवाल अपेक्षित आहे. अहवाल आल्यानंतर इतरांना उतरवलं जाईल. निगेटिव्ह लोकांना 7 दिवसांच्या होम आयसोलेशनसाठी शिक्का मारला जाईल. पोझिटीव्ह व्यक्ती पुन्हा रिचर्डसन आणि क्रुडास किंवा सशुल्क हॉटेल्समध्ये असतील.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.