नाना पटोलेंनी दुधात मीठ टाकायचं काम करू नये..., MCA निवडणुकीवरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद

मुंबई क्रिकेट असोसिसएशच्या (MCA) निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार हे एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलचं उधाण आलं होतं.
Nana Patole Vs Sharad Pawar, Ashish Shelar
Nana Patole Vs Sharad Pawar, Ashish Shelar

रश्मी पुराणिक -

मुंबई : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP And NCP) हे राज्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिसएशच्या (MCA) निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार (Sharad Pawar and Ashish Shelar) हे एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलचं उधाण आलं होतं.

अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केलेल्या टीकेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. तर राष्ट्रवादीने देखील या प्रकरणावरुन पटोलेंना सुनावलं आहे. 'राजकारण आणि खेळ हे वेगवेगळे विषय आहेत.दोघांना एकत्र करून नाना पटोले यांनी दुधात मीठ टाकायचं काम करू नये.

राहिला प्रश्न राष्ट्रवादी व भाजप नेत्यांच्या भेटीचा तर उघडपणे मीडियाला सांगून सार्वजनिक कामासाठी भेटतात. आम्हाला चोरून भेटायची सवय नाही आणि भेटलो तर कॅमेरे बघून तोंड लपवत नाहीत' असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलं आहे.

आज माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी MCA प्रकरणावर पवारांचे नाव न घेता भाष्य केलं आहे. शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झालं असताना BCCI मध्ये जी निवडणूक होतेय ते काय सुरू आहे जनता बघत आहे. आम्हाला यावर बोलायचे नाही यावर बोलणार नाही असं म्हणत पटोलें यांनी MCA निवडणुकीवरून शरद पवार यांना टोला लगावला.

पाहा व्हिडीओ -

शिवाय, हे समीकरण दिसत आहे, खेळात ही राजकारण होत असून ते लक्षात येत आहे. पक्षावर टीका नाहीये मात्र, जनतेच्या मनातील भावना मांडत आहे. हे काय चाललं आहे असे प्रश्न लोकं विचारत आहेत. भाजप देश बरबाद करत असताना काय सुरू आहे ते लोकांना दिसतय, अशी टीकाही पटोले यांनी पवारांचे नाव न घेता केली.

Nana Patole Vs Sharad Pawar, Ashish Shelar
Grampanchayat Election Result 2022 : साठ वर्षानंतर शंभूराज देसाईंच्या पॅनेलचा विजय; पाटणकरांना धक्का

MCA निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच मतमतांतर -

नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर पृथ्वीराज चव्हाण यांनी क्रिकेट मध्ये राजकारण आणू नये भूमिका मांडली आहे त्यामुळे MCA निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच मतमतांतर असल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com