पुणे महानगरपालिकेतील ठेकेदारांचा प्रताप; अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी विनाच काढले लाखोंची बिलं

बनावट करारनामे देऊन महापालिकेची लाखों रुपयाची फसवणूक
PMC
PMCSaam Tv
Published On

पुणे - भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असलेल्या पुणे (Pune) महानगरपालिकेत कोरोना काळात लाखो रुपयाचा आर्थिक गैर व्यवहार महापालिकेच्या ठेकेदारांनी केला आहे. निविदेच्या करार नाम्यावर पुणे महापालिका अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी विनाच काही ठेकेदारांनी लाखो रुपयाचे बिल परसपर काढले आहेत. अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत तीन लाखापर्यंतची काम निविदा न काढता काही स्वयंरोजगार संस्थांना क्षेत्रीय कार्यालयामार्फत दिली जातात. स्वयंरोजगार संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही काम ही काम प्रामाणिकपणे करावी असं महापालिका प्रशासनाला अभिप्रेत असते.

हे देखील पाहा -

मात्र विश्वास आधार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि हेल्पलाइन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या दोन संस्थांनी मिळून पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा गार व्यवहार केलेला आहे कामाच्या करारनामावर महापालिका अधिकाऱ्यांची स्वाक्षरी न घेताच दोन्ही संस्थांच्या ठेकेदारांनी महापालिकेकडून लाख रुपयाची बिल परस्पर काढून घेतली असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भरत सुराणा यांनी केला आहे.

विश्वास आधार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि हेल्पलाइन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या दोन संस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यानी आता या दोन संस्थांची चौकशी सुरू केली आहे.

PMC
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

ना खाऊंगा - ना खाने दूंगा असं अशी घोषणा देत पुणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत आली. मात्र याच भाजपच्या सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेत कोरोना काळात लाखो रुपयांचा गैरव्यवहार काही खाजगी संस्थांनी काही जनप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन केल्याचं, आता उघडकीस आले आहे. त्यामुळे चुकीचे कागदपत्र देऊन पुणे महापालिकेकडून लाखो रुपयांची बिल उकडणाऱ्या ठेकेदारांवर आता महापालिका काय कारवाई करणार ? याकडे सर्वसामान्य पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com