काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चौकशीचे आदेश

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो" असे वक्तव्य केले होते.
Nana Patole
Nana PatoleSaam TV
Published On

- सुशांत सावंत

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी "मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो" असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलाच धुराळा उडाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी भाजपकडून (BJP) नाना पटोलेंच्या या वक्तव्याविरोधात आंदोलने करण्यात आली होती, निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र, त्याच कालावधीत लागलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत हे प्रकरण मागे पडले होते.

हे देखील पहा :

याच प्रकरणाच्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी डीसीपी कार्यालय आणि पोलिस आयुक्तांकडे नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. परंतु, नाना पटोले यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने सर्व बाजूंनी हताश झालेल्या तिवाना यांनी न्यायालयात धाव घेत अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, शिवडी यांच्याकडे कलम १५३ (ब), ५०५, ५०५ (२), ५०४,५०६ अन्वये याचिका दाखल केली. पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nana Patole
माणुसकीला काळिमा! नवजात बाळास पित्यानेच विकल्याचा धक्कादायक प्रकार

आज, न्यायालयाने भोईवाडा पोलीस स्टेशनला याचिकेत नोंदवलेल्या सर्व कलमांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि २६ मे २०२२ रोजी न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तेजिंदरसिंग तिवाना (Tajinder Singh Tiwana) म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली. देशाचे पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे, पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद भाषा वापरणे हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे, मी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की सत्याचा पराभव होऊ शकत नाही. वाईट शब्दांनी बोलणाऱ्या नाना पटोलांसारख्या नेत्यांसाठी हा धडा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com